तुळजापूर प्रतिनिधी
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी तौफिक शेख यांची निवड झाल्याबद्दल शनिवार दि.23 रोजी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे शाल, श्रीफळ पुष्पगुछ देत सत्कार करण्यात आला.
शहरासह ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सदैव कटीबद्ध राहू असे आश्वासन तोफीक शेख यांनी बोलताना दिले.
यावेळी हाजी जावेद बागवान, हाजी गौस बागवान,जेष्ठ नागरिक गुलाबसाब तांबोळी, युसूफ शेख, आरिफ बागवान, फेरोज पठाण, मकसूद शेख, अशपाक शेख, मतीन बागवान, वाहेद शेख, मुसा शेख, इसाक बागवान, शफिक पटेल, जलील शेख आदी समाजबांधव उपस्थित होते.