काँग्रेसकडून तुळजापूरची जागा 'वेटिंग' वर ! तुळजापूरकडे जिल्ह्याचे लक्ष

mhcitynews
0


सिद्दीक पटेल 

महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाने गुरुवारी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात मराठवाड्यातील काही उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.


लातूर शहर मधून अमित देशमुख तर लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख, अक्कलकोट मधून सिद्धराम म्हेत्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.


तर आज शनिवार दि. 26 रोजी काँग्रेस च्या वतीने एकूण 23 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये हि तुळजापूर विधानससभे संदर्भात घोषणा केली नसल्याने तुळजापूरचे विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी कोणता उमेदवार जाहीर होणार याकडे तुळजापूर तालुक्यातील जनतेच्या नजरा लागून आहेत.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top