तुळजापूरात भाजपला जबर धक्का; मीनाताई सोमाजींसह असंख्य महिलांचा शिवसेनेत प्रवेश !

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यात भाजपच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचे स्पष्ट होत असून, आज भाजप महिला कार्यकारिणी सदस्या मीनाताई सोमाजी यांनी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला.


मुंबई येथे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा भव्य प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिंदे म्हणाले, “मी माझ्या बहिणींसाठी सदैव खंबीरपणे उभा आहे. महिलांना बळ देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.”


हा पक्षप्रवेश शिवसेना उपनेते ज्ञानराज चौगुले, जिल्हाध्यक्ष मोहन पनुरे, तसेच नूतन तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वात पार पडला. येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यात शिवसेनेच्या राजकीय बळात मोठी भर पडली आहे.


यावेळी मीनाताई सोमाजी – भाजप महिला कार्यकारिणी सदस्या, तुळजापूर शहरातील विविध प्रभागांतील महिला कार्यकर्त्या सह, सोमनाथ पांडुरंग गुड्डे –उबाटा गट, माजी उपसरपंच, जनशुभदा फाउंडेशन अध्यक्ष, अप्पासाहेब बिराजदार – माजी सरपंच, शंकर चव्हाण, नागनाथ कदम, इलाई शेख, शहाजी ज्ञानोबा हाक्के – उपसरपंच, मानेवाडी , लक्ष्मण सुभाष माने – तंटामुक्ती अध्यक्ष, मानेवाडी, स्वप्निल सुरवसे, आबा गुरव, सुरज सुरडकर यांचा प्रवेश घेण्यात आला.


तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी सांगितले की, “हा फक्त प्रारंभ आहे. लवकरच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत तुळजापूरमध्ये एक भव्य पक्षप्रवेश मेळावा होणार आहे, ज्यात अजून अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करतील.”


आजच्या प्रवेश सोहळ्यास शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, उपशहर प्रमुख रमेश काका चिवचिवे, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यामुळे तुळजापूरच्या राजकारणात नवा रंग भरल्याचे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top