प्रधानमंत्री आवास योजनेतील 61 लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर नगरपरिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर झालेल्या 61 लाभार्थ्यांच्या संदर्भात नगरपरिषदेत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विनोद (पिटु भैय्या) गंगणे (नगराध्यक्ष) आणि अजिंक्य रणदिवे (मुख्याधिकारी) उपस्थित होते.

बैठकीदरम्यान संबंधित 61 लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी आवश्यक परवाने निःशुल्क देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार आतापर्यंत 61 पैकी 53 लाभार्थ्यांना बांधकाम परवाने वितरित करण्यात आले आहेत, तर उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच परवाने देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या स्वतःच्या घराच्या स्वप्नाला गती मिळणार आहे. नगरपरिषद प्रशासनाने उर्वरित प्रक्रियाही जलदगतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top