तुळजापूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल- रुक्मिणीची मंगल आरती मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात संपन्न झाली. जिजामाता नगरातील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीरात पहाटे 4:30 वाजताच भाविकांनी गर्दी केली होती. मंगल आरती, तुलसी आरती, चैतन्य शिक्षा अष्टकम होऊन सर्व भक्तांकडून 16 माळा जप करवून घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन - धाराशिव व हरे कृष्ण भक्त तुळजापूर यांच्या वतीने ही आरती प्रत्येक एकादशीला करण्यात येते. जपानंतर प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी 30 ते 40 भाविकभक्त उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. इस्कॉनच्या विविध कार्यक्रमामुळे शहरातील वातावरण भक्तीमय बनले असून भाविकांचा प्रतिसाद वरचेवर वाढत असल्याचे दिसून येते.