स्थानिकांना आधार कार्ड दाखवून दर्शन मिळावा - सचिन रोचकरी

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दररोज लाखोच्या संख्येने भावीक भक्त तुळजापूर ला येत असतात भाविक भक्तांसोबत स्थानिक रहिवाशी महिला  पुजारी यांना दररोज सकाळ व संध्याकाळ एक तास दर्शनासाठी  सोडण्यात यावे यासाठी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकारी यांनी दि. 6 नोव्हेंबर रोजी मंदिर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी निवेदन दिले.

तुळजापूर शहरातील स्थानिक रहीवाशी, महीला,पुजारी यांना आधार कार्ड दाखवुन देवीजींच्या दर्शनासाठी प्रवेश दिला जात नाही स्थानिक नागरिकांचा विचार करून  पहाटे ५ ते ६ व सायंकाळी ५ ते ६ या वेळेत तुळजा भवानी मंदीरात दर्शनासाठी सोडण्यात यावे असे निवेदनात नमूद केले आहे. तर याबाबत येत्या विश्वस्त बैठकीत सकारात्मक विचार करून याबाबत प्रयत्न करू असे जिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिल्याचे सचिन रोचकरी यांनी यावेळी बोलताना म्हणाले.

निवेदनावर मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद गंगणे, पंडीतराव जगदाळे, विजय कंदले, औदुंबर कदम, किशोर साठे, माऊली भोसले, आनंद कंदले, नरेश अमृतराव, शांताराम पेंदे, लखण पेंदे, अमर हंगरगेकर, निलेश रोचकरी आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top