वडार समाजाला ओबीसी प्रवर्गातून बाहेर काढा - भरत विटकर

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

वडार समाज ओबीसी विमुक्त जाती म्हणून समाविष्ट आहे यामुळे वडार समाजाला  शैक्षणिक व आर्थिक याचा लाभ होतो परंतु या आरक्षणातून राजकीय लाभ कुठलाच मिळत नाही यामुळे हा समाज राजकारणापासून आजही दूर आहे.  राज्य सरकारने वडार समाजाला ओबीसी प्रवर्गातून बाहेर काढून इतर प्रवर्गातील आरक्षण समावेश करावा अशी मागणी कोल्हापूर ते नागपूर येथे  निघालेल्या वडार आरक्षण संघर्ष यात्रा प्रमुख भरत विटकर यांनी तुळजापूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, विमुक्त जमाती हा प्रवर्ग ब्रिटिश काळापासून स्वतंत्र ओळखला जाणारा प्रवर्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखनात अनेक ठिकाणी विमुक्त जमातीचे स्वतंत्र प्रवर्ग असल्याचे नमूद करून त्यांचे विदारक वास्तव्य त्यांच्या लोकसंख्येसह मांडलेले आहे. गुन्हेगार जमाती कायद्याने विमुक्त जमातींच्या अनेक पिढ्या  बरबाद झालेल्या असताना स्वतंत्र भारतामध्ये विमुक्त जमातींना संविधानिक संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे होते तो त्यांचा हक्कच होता परंतु तसे घडलेले नाही हे वास्तव्य असल्याचे भरत विटकर म्हणाले.

यावेळी अविनाश पवार, राजेंद्र बंडगर, तुकाराम चव्हाण, राम बंडगर, राजाराम चव्हाण, रमेश बंडगर, धनाजी चव्हाण, सिद्धराम चौगुले, नामदेव बंडगर सह वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top