ठरलं धीरज पाटील तुळजापूर विधानसभा लढणार

mhcitynews
0

 



सिद्दीक पटेल 
तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ॲड धीरज आप्पासाहेब पाटील यांना उमेदवारी महा विकास आघाडीवतीने जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून चर्चेचे होत असलेले गुऱ्हाळ थांबले असून या मतदारसंघात कडा मुकाबला होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

तुळजापूर मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदारसंघावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी सलग चार वेळा प्रतिनिधित्व करून या भागाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले आमदार राणाजगजिसिंह पाटील यांनी या मतदारसंघात उमेदवारी दाखल करून विजयश्री प्राप्त केली. भाजपने आमदार पाटील यांना पुन्हा या मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. त्यांनी अर्ज देखील दाखल केला आहे. मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावरून गेल्या चार-पाच दिवसापासून वरिष्ठ पातळीवर खलबते सुरू होते. मात्र शेवटच्या क्षणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड धीरज पाटील यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांची पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्याने या मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावरून असलेली उत्सुकता संपुष्टात आली आहे.




Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top