तुळजापूर प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी आज सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन कुलधर्म, कुलाचार पार पाडत भाविकतेने देवीची ओटी भरली. पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर राणे कुटुंबीय खास देवींच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे दाखल झाले होते.
राणे कुटुंबीय हे श्री तुळजाभवानी देवीचे निस्सीम भक्त आहेत. याआधी आठवड्याभरापूर्वीच राज्याचे मंत्री नितेश राणे यांनीदेखील तुळजाभवानीचे दर्शन घेतले होते. आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे, त्यांच्या पत्नी व इतर कुटुंबीयांनी मंदिरात उपस्थित राहून विधिवत दर्शन घेतले व देवीची ओटी भरली.
मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांनी श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा, कवड्यांची माळ व महावस्त्र भेट देत राणे दांपत्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन चौधर, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अनुप ढमाले, लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, दिनेश निकवाडे, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पाटील, प्रतीक दिवाणजी, सहायक जनसंपर्क अधिकारी अभिजित तेरखेडकर, पुजारी रामभाऊ छत्रे तसेच मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.