अहिल्यानगर येथील भाविकाकडून श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क विभागास संगणक संच भेट

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

अहिल्यानगर येथील एका देवी भक्ताने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क विभागासाठी एक संगणक संच दान केला आहे. संस्थानच्या जनसंपर्क विभागाच्या दैनंदिन कामकाजाची गरज ओळखून, भाविकाने आपली सामाजिक आणि धार्मिक बांधिलकी जपत ही महत्त्वपूर्ण भेट दिली.


विशेष म्हणजे, भाविकाने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती केली असून, ही सेवा केवळ मातेसाठी समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले. संगणक संचाच्या या दानामुळे जनसंपर्क विभागातील कामकाज अधिक सुलभ व गतिमान होणार आहे.


या कौतुकास्पद कार्याबद्दल जनसंपर्क विभागाच्या वतीने त्या भाविकाचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे आणि सहायक जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी या दानाचे मनःपूर्वक स्वागत करत भाविकाचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top