गरजू रुग्णांसाठी रविवारी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर

mhcitynews
0



तुळजापूर प्रतिनिधी

सर्वसामान्य तसेच गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत उपलब्ध व्हावी आणि आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, या सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने रविवारी मोफत सर्वरोग निदान, औषधोपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


मृणाली फाऊंडेशन, शिवसेना डॉक्टर सेल, कैलासवासी पवनराजी फाऊंडेशन तसेच आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर येथील पुजारी मंडळ मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.


या शिबिरात विविध आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून, आजाराचे निदान, आवश्यक औषधोपचार तसेच गरजेनुसार शस्त्रक्रियेसंदर्भातील मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचार घेणे शक्य न होणाऱ्या रुग्णांसाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.


तालुक्यातील नागरिकांनी ही आरोग्यसेवेची संधी दवडू नये. स्वतःसह आपल्या कुटुंबातील गरजू रुग्णांनी रविवारी पुजारी मंडळ मंगल कार्यालय येथे आवर्जून उपस्थित राहून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी आणि उपलब्ध मोफत उपचार सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top