![]() |
| एम एच सिटी न्युज चे उदघाटन लोकार्पण करताना मान्यवर |
सिटी न्यूज तुळजापूर
जनसामान्यांच्या हिताचे हे बिद्र घेऊन नव्याने सुरु केलेल्या एम एच सिटी न्युज या वेबिझीनचा लोकार्पण सोहळा दि 25 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथे माजी नगराध्यक्ष सचिन भैया रोचकरी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते तुळजापूर विधानसभा मतदार संघांचे अध्यक्ष गोकुळ तात्या शिंदे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंखे, पत्रकार संघांचे जिल्हा उपाध्यक्ष तथा दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी श्रीकांत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश कदम यांच्या प्रमुख शुभहस्ते एम एच सिटी न्युज चे लोगोचे उदघाटन ( लोकार्पण ) करण्यात आले.
तत्पूर्वी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत स्वरूपी सत्कार करण्यात आले.
![]() |
| उदघाटनीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. सतीश कदम सर |
उदघाटनीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. सतीश कदम यांनी सध्याचा काळ सोशल मीडिया पोर्टलचा असून 1832 साली दर्पण नावाचे जे पहिले वृतपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी काढले ज्याचे नाव सुद्धा दर्पण होते. दर्पण म्हणजे आरसा आणि आरसा हा खोटं बोलत नसतो या वृत्तीने आजचा पत्रकार आपले वार्तांकन करीत असतो, पत्रकारिता करीत असताना समाजाला चांगले काय काय देता येईल, पत्रकाराची वृत्ती ही न्यायाधीशाची असावी न्यायाधीश हा प्रत्येकात येईल असेही नाही मात्र या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत प्रा.डॉ.सतीश कदम यांनी मांडले. मनोगत व्यक्त करीत असताना त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात असताना अनुभवलेल्या सुखद घटना हि त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन भैया रोचकरी, राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते गोकुळ तात्या शिंदे, पत्रकार श्रीकांत कदम, युवक नेते आनंद कंदले, लखन पेंदे, महेशजी चोपदार,प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल भैया रोचकरी,माजी नगरसेवक राहुलजी खपले यांनीही आपले मनोगत व शुभेच्छा व्यक्त केल्या
![]() |
| उपस्थित मान्यवरांचे स्वागत करतान |
यावेळी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सत कदम, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गोकुळ तात्या शिंदे, माजी नगराध्यक्ष सचिन भैया रोचकरी, भारतीय जनता पार्टीचे युवक तालुका अध्यक्ष आनंद कंदले, काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष लखन पेंदे, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष शरद जगदाळे, महेश चोपदार, बाळासाहेब चिखलकर शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक राहुल खपले, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल भैया रोचकरी, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष तोफीक शेख, राष्ट्रवादीचे तालुका संघटन व प्रसिद्धी प्रमुख बबन नाना गावडे, भाजप युवक जिल्हा उपाध्यक्ष दिनेश बागल, पत्रकार संघांचे तालुका अध्यक्ष प्रदीप अमृतराव, दैनिक संचार चे गुरुनाथ बडूरे, दैनिक सुराज्य,समय सारथी चे कुमार नाईकवाडी, दैनिक तरुण भारत संवादचे सचिन ताकमोघे, दैनिक सामनाचे अनिल आगलावे, दैनिक संघर्षचे संजय खुरुद, दैनिक जनमतचे अमीर शेख, राष्ट्रवादीचे युवानेते गणेश नन्नवरे, आजाद यंग ग्रुपचे अध्यक्ष मोहसीन बागवान, अल्पसंख्यांक विभागाचे शहर उपाध्यक्ष मकसूद भाई शेख, तालुका कार्यध्यक्ष आरिफ भाई बागवान, युसूफ भाई शेख, तोसिफ शेख, सिराज शेख, धैर्यशील दरेकर, गोपाळ माळी, वसीम पटेल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विवेक कोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन एम एच सिटी न्युजचे सर्वेसर्वा सिद्दीक पटेल यांनी मानले.



