विठ्ठल मंदिरात मंगल आरती उत्साहात संपन्न

mhcitynews
0

 


तुळजापूर | प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन धाराशीव व हरे कृष्ण भक्त तुळजापूर यांच्या वतीने षट्तिला एकादशी व मकर संक्राती निमित्त मंगल आरती उत्साहात पार पडली . जिजामाता नगर येथील श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात पहाटे 04:45 वा . भाविकांनी हजेरी लावली होती . मंगल आरती, तुलसी आरती, चैतन्य शिक्षा अष्टकम होऊन उपस्थितांकडून ' हरे कृष्ण ' महामंत्राचा 16 माळा जप करवून घेण्यात आला . पहाटेच्या आल्हादायक वातावरणात मंदीर गजबजून गेले होते . 


एकादशी दिवशी सर्व पापे अन्नामधे असल्याने या दिवशी अन्न खाणे पूर्णपणे वर्ज्य आहे . एकादशी दिवशी उपवास पदार्थ खावे व जास्तीत जास्त नाम जप करावा असे प्रभूजी बोलताना म्हणाले . इस्कॉनच्या संपर्कामुळे तुळजापुरातील बरेच भक्त आध्यात्मिककडे वळले असून नियमित नाम जप करणाऱ्यांची संख्या बरीच आहे .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top