इटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनेपुरस्कार प्रदान
मंगरूळ प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील लक्ष्मण माळी यांना ईटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ''युवा उद्योजक पुरस्कार ''आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र , शाल , फेटा , पुष्पगुच्छ , पेन , स्वामी विवेकानंद यांचे आत्मचरित्र देऊन सन्मानित करण्यात आले. ईटकळ ग्रामीण पत्रकार संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना रविवार 8 जानेवारी रोजी विवांता रिसॉर्ट इटकळ येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
मंगरूळ सारख्या ग्रामीण भागात मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या माध्यमातून करोडोंची उलाढाल केल्याबद्दल व त्यांनी नवनवीन संकल्पना राबवण्याबद्दल व ग्राहकात विश्वास निर्माण करून उत्तम सर्विस दिल्याने त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर , माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे , तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी देविदास पाठक , नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे , डॉक्टर राजाराम शेंडगे , प्राध्यापक रामदास ढोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार दयानंद काळुंखे यांनी तर सूत्रसंचालन दिनेश सलगरे यांनी केले या कार्यक्रमासाठी इटकळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनेश सलगरे , उपाध्यक्ष लियाकत खुदादे , सचिव केशव गायकवाड , सदस्य चांदसाहेब शेख , नामदेव गायकवाड , बालाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी तालुक्यासह जिल्ह्यातील पत्रकार बांधव , सामाजिक, शैक्षणिक, राजकीय , वारकरी संप्रदाय यांच्यासह ईटकळ व परिसरातील सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मण माळी यांना हा पुरस्कार मिळाल्याने मंगरूळ व परिसरातील नागरिकांतून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
