तुळजापूर प्रतिनिधी
15 वर्षाखालील (सबज्युनिअर) गटात राष्ट्रीय स्पर्धेत रजत व कांस्य पदकाची कमाई अहमदाबाद (गुजरात) येथे पार पडलेल्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडुन प्रतिनिधीत्व करत तुळजापूरची खेळाडु प्रियांका हंगरगेकर हिने कास्य सांघिक व प्रियांका हंगरगेकर व यशराज हुंडेकरी यांने रजत पदक पटकावले.
नॅशनल सॉफ्ट टेनिस असोसिएशन व गुजरात सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्यावतीने दि 26 ते 30 डिसेंबर 2022 दरम्यान ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मुलींच्या महाराष्ट्र संघाने सांघीक कांस्य तर दुहेरीत रजत पदाकाची कमाई केली. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक संजय नागरे, हेमंत कांबळे, राहुल जाधव, राज्य संघटनेचे अध्यक्ष सुनिल पुर्णपात्रे, राज्य सचिव रविंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष संदिप गंगणे, सचिव सिराज शेख यांनी परिश्रम घेतले. या यशाबद्दल प्रियांका हंगरगेकर व यशराज हुंडेकरी व मुलींच्या महाराष्ट्र संघाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
