तुळजापूर प्रतिनिधी
युवा भीम सेना महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा डोलारे यांच्या प्रमुख उपस्थित शासकीय विश्राम गृह तुळजापूर येथे शनिवार दि.11 मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीत युवा भीमसेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी दत्ताभाऊ कांबळे तर जिल्हाध्यक्षपदी गोरख भाऊ पारधे, जिल्हा उपाध्यक्षपदी संदीप शिरसाठ तर जिल्हा कार्याध्यक्षपदी रावसाहेब वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली निवडीचे पत्र युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा डोलारे यांचा हस्ते देण्यात आले.
यावेळी लेखक तथा संपादक विजय सर बनसोडे, दलित पॅंथरचे जिल्हाध्यक्ष मिलिंद दादा गायकवाड, ऍडव्होकेट मारुती शिंदे साहेब जिल्हा व सत्र न्यायालय पुणे, पत्रकार तथा संपादक सोमनाथजी बनसोडे, तालुका अध्यक्ष मी वडार महाराष्ट्राचा बाळासाहेब शिंगे, आदिवासी पारधी समाजाचे दलित पॅंथर चे प्रदेशाध्यक्ष अनिल भोसले, सामाजिक कार्यकर्ते अंबादास वराडे, जयराज सोनवणे व मोठ्या संख्येने बहुजन समाज बांधव उपस्थित होते.
