संगनमत करून विकास कामात भ्रष्टाचार ! चौकशीची मागणी

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

सन २०१७ ते २०२२ या कालावधीत मौजे अपसिंगा ग्रामपंचायत  येथे विविध विकास कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, बऱ्याच कामामध्ये कामे न करता कागदोपत्री मेळ लावुन संगनमत करून विविध विकास कामात भ्रष्टाचार केल्याची  शुक्रवार दि. 3 मार्च रोजी तक्रारीचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जिल्हा परिषद यांना देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मौजे अपसिंगा ग्रामपंचायत येथे सन २०१७ ते २०२२ कालावधीत तत्कालीन  सरपंच / ग्रामसेवक / संबंधीत विभागातील अभियंते, विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी, तुळजापूर यांनी संगनमताने गैरव्यवहार केल्याचे प्रथमदर्शी दिसुन येत आहे. तांडा सुधार योजना अंतर्गत १० लक्ष रु. ( सन २०२१-२२ व २०२२-२३ ) करीता निधी खर्चीत झाल्याचे दिसुन येत असताना प्रत्यक्षात रस्ताच झाल्याचे दिसुन येत नाही. तरी अशाच प्रकारची कामे मोठ्या प्रमाणात सन २०१७ ते २०२२ या कालावधीत झाल्याचे निदर्शनास येते. या करीता सखोल चौकशी होणे गरजेचे असून. याबाबत विभागनिहाय चौकशी समिती गठीत करुन पुढील कार्यवाही करण्याचे आदेशीत द्यावे अन्यथा याविरोधात जन आंदोलन उभारण्यात येईल अशी तक्रार अपसिंगा येथील अमीर इब्राहिम शेख यांनी दिलेल्या तक्रारी निवेदनात नमूद केले आहे निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top