![]() |
अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी दि.25.04.2023रोजी जिल्हाभरात एकुण 11 कारवाया केल्या. यात घटनास्थळावर आढळलेली तर गावठी दारु व देशी- विदेशी सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त केले.जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 2,75,120 ₹ आहे. यावरुन 17 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 11 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1)उमरगा पोठाच्या पथकास माडज, ता. उमरगा येथील- संजय शेषेराव तोडकर हे 19.25 वा. सु.आपल्या भिमनगर माडज येथे एकुण 2,540 ₹ किंमतीची गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तर पळसगाव तांडा, ता. उमरगा येथील- बधुकर थावरु राठोड, राजू राठोड, मनोज राठोड, संजय चव्हाण, विठ्ठल लक्ष्मण जाधव, निळकंठ राठोड, माणिक चव्हाण, विनोद पवार हे सर्व 06.20 ते 06.30 वा. सु पळसगाव साठवण तलाव येथे एकुण 2,24,000 ₹ किंमतीची गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
2)भुम पोठाच्या पथकास भवानवाडी टें, ता. भुम येथील- महादेव भानुदास ठोंबरे हे 16.50 वा. सु.भवानवाडी येथे एकुण 910 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
3)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुंजोटी, ता. उमरगा येथील- दत्तात्रय गंगाराम थोरात हे 20.30 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकुण 14,000 ₹ किंमतीच्या गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तर बोरीमातोळ, ता. उमरगा येथील-किसन काशीनाथराव मदने हे 21.30 वा. सु. उमरगा बसस्थानक येथे एकुण- 10,000 ₹ किंमतीची गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
4)बेंबळी पोठाच्या पथकास मेंढा तांडा येथील –सुधाकर बबन जाधव हे 15.00 वा. सु. एकुण 1,120 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले, तर टाकळी बेंबळी उस्मानाबाद येथील- भास्कर काशिनाथ राठोड हे 15.00 वा. सु. टाकळी ते कनगरा रोडलगत येथे एकुण 2,450 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
5)आनंदनगर पोठाच्या पथकास शिंगोली रेस्टहाउस उस्मानाबाद येथील- अनुराधा कुंदन पवार ह्या 19.30 वा. सभांली नगर येथे एकुण 1,640 ₹ किंमतीची गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
6)मुरुम पोठाच्या पथकास आष्टाकासार, ता. लोहारा येथील- राजेंद्र मधेकर चौधरी हे 19.00 वा. सु. आष्टाकासार येथे शिवनेरी पान सटॉलच्या पाठीमागे येथे एकुण 4,480 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
.jpeg)