तुळजापूर प्रतिनिधी
सध्या मुस्लीम समाजाचा रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत युवा नेते विनोद पिटू गंगणे मित्र परिवार यांच्यावतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इफ्तार पार्टीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव, पक्षीय पदाधिकारी, सर्व क्षेत्रातील बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
तुळजापुरात सर्वधर्मसमभाव या रीतीने तुळजापूर आणि परिसरात एकता आणि बंधुता राखून सगळ्याच कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या थाटात केले जाते त्याचाच एक भाग म्हणजे मंगळवार सायंकाळी इफ्तार पार्टीचे केले आयोजन. राज्यात सुरू असलेल्या राजकीय आणि सामाजिक वादाकडे दुर्लक्ष करत या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इफ्तार पार्टीत विविध खाद्यपदार्थ तसेच फलाहार चा आस्वाद उपस्थितांनी घेतला. यावेळी युवा नेते विनोद पिटू गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक पंडितराव जगदाळे, माऊली भोसले, अजित परमेश्वर, किशोर साठे, अविनाश गंगणे, युवक नेते लखन पेंदे, नरेश काका अमृतराव, रत्नदीप भोसले, मनोज गवळी, सचिन कदम, राजेश्वर कदम, भाजप शहर अध्यक्ष शांताराम पेंदे जेष्ठ नागरिक हाजी रसूल बागवान, युसूफ शेख, आजाद ग्रुप चे मोहसीन बागवान यांच्या सह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
