पत्रकारांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन
तुळजापूर प्रतिनिधी
दर्पण दिनाचे औचित्य साधून लोकमंगल मल्टीस्टेटच्या वतीने शहरातील सर्व पत्रकारांचा सत्कार करून पत्रकारांच्या हस्ते लोकमंगल मल्टीस्टेट दिनदर्शिकेचे प्रकाशन दिनांक 8 जानेवारी सोमवार रोजी बँकेच्या कार्यालयात करण्यात आले. पत्रकार श्रीकांत कदम, प्रदीप अमृतराव, सचिन ताकमोघे, संजय खुरुद, सचिन ठेले, सिद्दीक पटेल यांचा सत्कार शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बँकेचे वाईस चेअरमन बालाजी शिंदे , संचालक सचिन आडगळे, अॅड. तानाजी जगताप, बालाजी शिंदे, मकरंद लबडे, विनोद देवकर, फजल सिद्दिकी, प्रशांत पवार, खंडेराव देवकर, शंकर क्षिरसागर, आदींसह बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.