आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा भाजप धाराशिव जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष; नगराध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळख
तुळजापूर शहरातील सामाजिक, राजकीय आणि जनहिताच्या कार्यात सातत्याने सक्रिय असलेले आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक मोहसिन बागवान यांचा आज वाढदिवस. नुकतीच त्यांची भारतीय जनता पार्टी, धाराशिव जिल्हा अल्पसंख्यांक उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याने त्यांच्या कार्याला पक्षाने दिलेली ही महत्त्वाची दखल मानली जात आहे.
मोहसिन बागवान हे तुळजापूरचे लोकप्रिय नगराध्यक्ष विनोद (पिटू) गंगणे यांचे कट्टर समर्थक म्हणून राजकीय वर्तुळात ओळखले जातात. नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासासाठी, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनसंपर्क वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. संघटनात्मक कामात त्यांची मेहनत, शिस्त आणि कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध विशेष उल्लेखनीय मानला जातो.
समाजकारण हीच खरी लोकसेवा या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम राबविले आहेत. रक्तदान शिबिरे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य जनजागृती, सामाजिक सलोखा, गरजू कुटुंबांना मदत, शासकीय योजनांची माहिती आणि नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
तुळजापूर शहरासह संपूर्ण तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विविध समस्या समजून घेऊन त्या प्रशासनाच्या स्तरावर मांडणे आणि त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, ही त्यांच्या कार्याची खास ओळख बनली आहे. सामान्य नागरिकांना न्याय मिळावा, युवकांना संधी उपलब्ध व्हावी आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी ते सदैव तत्पर असतात.
युवकांमध्ये मोहसिन बागवान यांची विशेष लोकप्रियता असून त्यांचा साधेपणा, स्पष्टवक्तेपणा, लोकांशी जुळवून घेण्याची शैली आणि सामाजिक बांधिलकी यामुळे अनेक युवक त्यांना प्रेरणास्थान मानतात. समाजकारणात नवीन पिढीने पुढे यावे, लोकसेवेची भावना जोपासावी आणि सकारात्मक राजकारणाला बळ द्यावे, यासाठी ते सातत्याने युवकांना प्रोत्साहन देत असतात.
राजकीय जबाबदारी आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा सुंदर समतोल राखत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अश्या युवा पिढीत युवा नेतृत्वास जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
संपादक…..
