पशुवैद्यकीय दवाखान्याला संरक्षण भिंत उभारण्याची मागणी

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (खु.) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसराला संरक्षण भिंत नसल्यामुळे दवाखान्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे दवाखान्याच्या इमारतीसह परिसर व औषधसाठ्याच्या सुरक्षेसाठी तातडीने संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या सौ. सीमा भैरवनाथ माडजे यांनी केली आहे.


याबाबत त्यांनी जिल्हा परिषद धाराशिवच्या पशुसंवर्धन समितीच्या सभापतींकडे दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी लेखी निवेदन सादर केले आहे.


निवेदनात म्हटले आहे की, तीर्थ (खु.) गावामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना कार्यरत असून परिसराला संरक्षण भिंत नसल्यामुळे दवाखान्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अडचणी निर्माण होत आहेत. दवाखान्याची इमारत, परिसर तसेच औषधसाठा यांचे योग्य संरक्षण होण्यासाठी संरक्षण भिंत उभारणे आवश्यक आहे.


गावातील पशुपालकांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना महत्त्वाची सेवा देत असल्याने या ठिकाणी सुरक्षित व संरक्षित वातावरण असणे गरजेचे आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार संरक्षण भिंतीचे बांधकाम करून देण्यात यावे तसेच त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सौ. सीमा माडजे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


या मागणीची दखल घेऊन संबंधित विभागाने लवकरात लवकर संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी निधी मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व पशुपालकांकडून व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top