तुळजापूर प्रतिनिधी
स्वर्गीय सौ. छायाबाई माधवराव कुतवळ ट्रस्ट आणि मराठवाडा साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार इंद्रजीत पाटील यांच्या 'शेलक्या बारा' या कथासंग्रहाचे प्रकाशन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते 9 जानेवारी मंगळवार रोजी येथील शिवपार्वती मंगल कार्यालय मध्ये पार पडणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण राहणार असून आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट धीरज पाटील, राष्ट्रपती पदक प्राप्त शिक्षक व राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक श्रीकांत पाटील, ज्येष्ठ साहित्यिक दि.बा. पाटील, साहेबराव मोरे, मारुती वाघमोडे, शिवाजी शिंदे, ह. भ. प. डॉ. रंगनाथ कानडे महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे मराठी ग्रामीण जीवनाचे यथार्थ चित्रण असलेल्या गावगाड्यातील बहुतांशी सार्थ अनुभूती देणाऱ्या निवडक 12 कथांचा संग्रह शेलक्या बारा या मराठी साहित्यात मोलाची भर घालणारा संग्रह असेल. या कार्यक्रमास साहित्य रसिक वाचक साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान माधवराव कुतवळ, अमोल कुतवळ, अमर हंगरगेकर, आप्पासाहेब कुतवळ, डॉ. दिग्विजय कुतवळ यांनी केले आहे.