बापाचीच गाडी.. आणि बापाच्याच पैशाचे पेट्रोल... 50 रुपयांचा गॉगल लावून दिला जातोय मुलींना त्रास...!

mhcitynews
0

परीक्षा काळात रोडरोमिओंचा उच्छांद ..!

सिद्दीक पटेल 

सध्या 12 वी बोर्डाच्या ( HSC) परीक्षा चालू असून ऐन परीक्षांच्या काळात रोडरोमिओंनी शाळेच्या मुलींना टारगेट करून त्यांची छेडछाड केली जात आहे. त्यामुळे पालकांनी चिंता व्यक्त केली असून रोड रोमिओंवर कारवाईची मागणी केली जात आहे.  तुळजापूर येथे यशवंतराव महाविद्यालय तथा म वि. रा. शिंदे हायस्कुल येथे प्रमुख दोन मोठे परीक्षा केंद्र असून येथे शहरी तथा ग्रामीण भागातून परीक्षा देण्यासाठी मुली येत असतात मुली परीक्षेला जाताना रोडरोमिओ गल्लीतील कॉर्नरला, कॉलेजजवळ किंवा निर्जन रस्त्यावर बसून त्यांची छेड काढतात. बेस्ट ऑफ लक देण्याच्या नावाखाली मुलींना त्रास देतात.


एकुलता एक मुलगा... म्हणून आई वडिलांकडून पाहिजे तो लाड

पुरवला जातो..गाडी- मोबाईल कपडे... सगळं काही..स्वतःची

शिक्षणाच्या नावाने बोंब... म्हणून बाहेरील गावावरून शिक्षण

घेण्यासाठी आलेल्या मुलींना त्रास देणे... बापाने दिलेल्या गाडीत

बापाच्याच पैशाचे पेट्रोल टाकून... डोळ्यावर 50 रुपयांचा गॉगल

 


लावून मुलगी दिसली की तिच्याकडे एकटक पाहत राहणे, शिट्टी वाजविणे, विनाकारण आवाज देणे, तिच्या अगदी जवळून दुचाकी नेणे, तिचे लक्ष वेधण्यासाठी जोरात हॉर्न वाजवून  मुलींना त्रास देण्याचे सर्रास प्रकार तुळजापूर येथे कॉलेज परिसरात घडताना दिसत आहेत. पेपर सुटण्याच्या वेळेत कॉलेजच्या प्रवेशद्वारावर रोडरोमिओ दबा धरून...बसत असल्याचे निदर्शनास येते आहे. तुळजापूर पोलिसांनी परीक्षा काळात कॉलेज परिसरात आणि मुख्य रस्त्यांवर गस्त घालावी, अशी मागणीही पालक वर्गातून केली जात आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top