तुळजापुर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे गड आला पण सिंह गेला असे स्वराज्याचे सुभेदार तानाजी मालुसरे यांचे 13 वे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे यांनी सहकुटुंब आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेत विधीवत पूजा केली यावेळी भोपे पुजारी प्रशांत कदम सोंजी यांनी त्यांची विधिवत पूजा केली.
दर्शना नंतर मालुसरे परिवाराचे प्रशासकीय कार्यालया मध्ये मंदिर संस्थांनच्या वतीने व्यवस्थापक विश्वास कदम यांनी तुळजाभवानीची प्रतिमा महावस्त्र देऊन त्यांचा सन्मान सत्कार केला.
कुणाल मालुसरे यांनी जनहित मुख्यालय येथे भेट देऊन जनहिताच्या कार्याची स्तुती करत स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले.
