तुळजापूर प्रतिनिधी
तुळजापुर शहर व मौजे आपसिंगा येथे संत रोहिदासयांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली शहरातील एस टी कॉलणी परिसरात जेष्ठ समाजसेविका मा .सौ. प्रज्ञाताई गायकवाड यांच्या वतीने एस .टि .कॉलनी येथे संत शिरोमणी राष्ट्रसंत गुरू रविदासजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गुरू रविदासांच्या प्रतिमेचे पुजन सौ . हंगरगेकरताई यांच्या प्रमुखहस्ते करण्यात आले . प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व प्रतिष्ठीत महिलांचा फेटा घालुन शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आलो . या जयंतीच्या प्रसंगी महिलांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. तसेच मौजे आपसिंगा येथे ग्रामपंचायत कार्यालय येथे जेष्ठ सामाजीक कार्यकर्त्या मा.सौ. प्रज्ञाताई गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले . या वेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व गावकरी मोठया संखेने उपस्थित होते.

