
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मा.श्रीमती.रुपाली मोहिते मॅडम न्यायाधीश,कौटुंबिक न्यायालय धाराशिव
टीम सिटी न्यूज
धाराशिव येथील कौटुंबिक न्यायालयाच्या सहाव्या
वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सन २०१८
साली धाराशिव येथे कौटुंबिक न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती.
कार्यक्रमासाठी मा.श्रीमती रुपाली मोहिते मॅडम, न्यायाधीश,कौटुंबिक न्यायालय धाराशिव यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान
भूषविले. मा. Adv.एम.एस.पाटील,माजी चेअरमन व सदस्य,बार कौन्सिल ऑफ
महाराष्ट्र व गोवा, व मा. Adv.रविंद्र कदम अध्यक्ष जिल्हा विधिज्ञ मंडळ,धाराशिव हे
कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

मा. Adv.एम.एस.पाटील,माजी चेअरमन व सदस्य,बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा उपस्थितांना मार्गदर्शन करताना.
विवाहपूर्व समुपदेशन
कार्यशाळा व कायदेविषयक कार्यशाळा यावर आधारित कार्यक्रमाची रूपरेखा होती.कार्यक्रमामध्ये
सुरुवातीला Adv.श्रीमती गोसावी यांनी जगता आले पाहिजे ही कविता सादर केली.कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन व प्रास्ताविक श्री.एस.डी.मोरे यांनी केले तर आभार श्री.आर.एस.मेंढापुरकर
यांनी मांडले.
श्री.एस.डी.मोरे , विवाह समुपदेशक , कौटुंबिक न्यायालय,धाराशिव मार्गदर्शन करताना तसेच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देताना..
![]() |
| मा. Adv.रविंद्र कदम अध्यक्ष जिल्हा विधिज्ञ मंडळ,धाराशिव उपस्थितांना मार्गदर्शन करताना. |
या कार्यक्रमासाठी डॉ.बापुजी
साळुंखे विधी महाविद्यालय,धाराशिव तसेच श्रीमती सुशीलादेवी साळुंके कॉलेज ऑफ
एज्युकेशन,अध्यापक विद्यालय,व्यंकटेश महाजन कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या
कार्यक्रमासाठी उपस्थित होते.सामाजिक न्यायभवनाच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार
पडला.

डॉ.बापुजी साळुंखे विधी महाविद्यालयाचे विध्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
