Fast for implementation of notification | मराठा आरक्षण अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी आमरण उपोषण

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

मराठा आरक्षणाचा हा लढा मागील सहा महिन्यापासून अत्यंत तीव्र पद्धतीने सुरू आहे महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठीची अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठा योद्धा मनोज जिरंगे पाटील हे दिनांक 10 फेब्रुवारी पासून आमरण उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्या खाली दि 12 फेब्रुवारी पासून तेजस बोबडे हे अमरण उपोषणास बसले आहेत त्यांना संपूर्ण सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषास बसणार आहेत. पहिल्या दिवशी त्यांच्या समवेत साखळी उपोषणास विशाल रोचकरी हे बसले आहेत. उपोषणाचे निवेदन नायब तहसीलदार यांना उपोषण स्थळी देण्यात आले.


यावेळी तेजस बोबडे, विशाल रोचकरी, अजय सांळुके, प्रशांत सोंजी, सचिन ताकमोघे, रवींद्र इंगळे, सत्यजित साठे, पप्पू इंगळे, प्रसाद मुळे, अक्षय साळवे, सतीश पवार आदींसह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top