![]() |
| शिक्षक व्यक्तिमत्व शिबीराचे उद्घाटन करताना मान्यवर. |
स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करून 21 व्या शतकातील विद्यार्थ्यांची आव्हाने स्विकारण्यास छात्राध्यापकांनी तयार रहावे असे मत डॉ. शोभा मिसाळ यांनी श्री तुळजाभवानी जुनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन, तुळजापूर येथे अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिक भाग असलेले शिक्षक व्यक्तिमत्व सत्र 2 चे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री एस.एन. दोंड उपस्थित होते.
प्रथम कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची व शिक्षणमहर्षी डाॅ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. छात्राध्यापकांनी तयार केलेल्या 'अभय' या शैक्षणिक भित्तिपत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर हर्षवर्धन सुरवसे याने मूकअभिनय, ज्योती भालेराव हीने एकपात्री अभिनय, नंदिनी कोळेकर हीने विनोदी बातम्या, विशाल मदने व श्रीशैल्य शिंदे यांनी लेझीम नृत्य तर प्रथम व द्वितीय वर्षातील मुलींनी फ्लॅश माॅब नृत्य तसेच 5 समूहगीते अशा विविधांगी सादरीकरणाने छात्राध्यापकांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबिका माळी आणि ऋतुजा भोसले यांनी केले तर नंदिनी कोळेकर, विशाल मदने, माधुरी डोलारे, प्रीती जाधव व पार्वती स्वामी यांनी मनोगते व्यक्त केली. पत्रिका वाचन कोमल तिकोने हीने केले तर आभार प्रदर्शन भाग्यश्री डोलारे हीने केले. कार्यक्रमासाठी प्रा. एस आर कोळी, प्रा. अरुण चौधरी प्रा.उल्हास झालटे, गरदडे एस आर ,संजय गंभीरे तसेच प्रथम व द्वितीय वर्षाचे छात्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन शिक्षक व्यक्तिमत्व विभागप्रमुख प्रा. विवेक कोरे यांनी केले.
