तुळजापुर प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार तुळजापूर तालुक्याची बैठक तालुकाध्यक्ष धैर्यशीलभैया पाटील, युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक 10 रोजी शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली.
बैठकीमध्ये युवक तालुका कार्यकारीणी मुलाखती घेऊन नियुक्ती करणे, ग्रामीण भागातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निहाय युवक पदाधिकारी यांची निवड करणे,शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार व भाजपा प्रणित निवडणूक आयोगाने जो पक्षाचा निर्णय चुकीच्या पद्धतीने कसा दिला व केंद्र व राज्य सरकार हुकूम शाही पद्धतीने वागत आहे हे प्रत्येक पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी जनमानसापर्यंत पोहोचवणे, ग्रामीण भागातील जनतेच्या अडीअडचणी पदाधिकाऱ्यांनी सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी या बैठकीत चर्चा करण्यात आली.
पक्ष चिन्ह जरी गेले तरी पक्षाचा कार्यकर्ता व आदरणीय शरद पवार साहेब यांच्या विचारांचा कार्यकर्ता पक्षासोबत आहे पक्ष तालुक्यात आणखी बळकट करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. बैठकीत ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांनी युवकांना मार्गदर्शन केले. प्रसंगी यावेळी येडोळा येथील प्रसाद जाधव, गोवर्धन लोंढे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह प्रवेश केला व विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष पदी नळदुर्ग येथील ताजोदीन शेख यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नेते बाबा काशीद, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव,तुळजापुर विधानसभा प्रभारी अध्यक्ष शिवाजी सावंत उपाध्यक्ष रुबाब पठाण, शहाजी ननवरे ,सुनील शिंदे, छोटू पाटील शहराध्यक्ष अमर चोपदार, उपाध्यक्ष मकसूद शेख, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष तौफिक शेख, युवक जिल्हा कार्याध्यक्ष विवेक शिंदे, ऍड .अमोल पाटील, गणेश नन्नवरे, गजानन देशमुख, युवक तालुका प्रभारी अध्यक्ष शरद जगदाळे, कार्याध्यक्ष राजकुमार बोबडे, उपाध्यक्ष राहुल हंगरगेकर सरचिटणीस रवी पाटील, विद्यार्थी जिल्हा उपाध्यक्ष ताजुद्दीन शेख, जीवन पाटील, गोविंद देवकर, सचिन जाधव, अंगद माळी, महेश नलावडे, शहाजी कसबे, चंद्रकांत डावरे, ओंकार चोपदार, सलीम शेख , सलमान शेख, जुबेर शेख बैठकीस तालुक्यातून बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक गणेश नन्नवरे, सूत्रसंचालन अमोल पाटील यांनी केले व आभार शरद जगदाळे यांनी मानले.

