तुळजापूर प्रतिनिधी
श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा तुळजापूर तालुक्याचे युवा नेते सुनील मधुकरराव चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मुंबई याच्या संचालक पदी बिनविरोध निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल जिल्हयातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
सुनील चव्हाण श्री खंडोबा पणन सहकारी संस्थेचे चेअरमन, श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा सहकार क्षेत्रातील वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य सुनील चव्हाण हे करत असून त्यांच्या सहकार क्षेत्रातील अनुभवामुळे त्यांची बिनविरोध वर्णी आहे.
मराठवाड्यातून दोन जणांची संचालक म्हणून निवड केली जाते त्या सुनील चव्हाण याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.पुढील काळात पणन महासंघास त्यांच्या कार्य कुषलतेचा व अनुभवाचा फायदा होणार असून पणन महासंघाला फायदा होणार आहे.त्यांच्या निवडीबद्दल अणदूर व परिसरात फटाक्याची आतषबाजी करीत निवडीचे स्वागत करण्यात आले आहे.
