मंदिर संस्थान नोकर भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्या ; शिवबाराजे प्रतिष्ठान

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथील नोकर भरतीमध्ये जिल्ह्यातील स्थानिकांना प्राधान्य देण्याबाबत शिवबाराजे प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार दि.२१ रोजी जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉ.सचिन ओंम्बासे यांना निवेदन देण्यात आले आहे.


निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मार्फत संदर्भीय जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सदर जाहिरातीचे ऑनलाईन फॉर्म हे येत्या २३ मार्चपासून सुरू होत आहेत. तरी सदरील धाराशिव जिल्हा हा दुष्काळ सदृश्य जिल्हा असून जिल्ह्यामध्ये कोणतेही उद्योग,व्यापार नाही. जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत विविध संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरताना तुळजापूर तालुका तसेच धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक व्यक्तींना प्रथम प्राधान्य देऊन त्यांची नियुक्ती केल्यास न्यायाचे होणार असल्याचे नमूद केले आहे.


निवेदनावर शिवबाराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन साळुंके, विलास वाघमारे, दत्ता हुपे, बबलू राऊत, दीपक शेळके, उल्हास घोगरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top