तुळजापुर
धाराशिव जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख आहे त्यात यावर्षी पावसाने कमी झाल्याने जिल्ह्यासह तुळजापूर तालुक्यावर दुष्काळाचे मोठे सावट घोंगावत आहे, अशा परिस्थितीमध्ये तुळजापूर शहरातील सर्व बांधकाम परवाने पाण्याचा अभाव जाणवून नये म्हणून थांबवले आहेत.
अशा परिस्थितीत नगरपरिषदेचे मात्र कामे राजरोसपणे चालू आहेत तुळजापूर हे धार्मिक स्थळ आहे लाखो लोक येथे दर्शनासाठी येत असतात अशा परिस्थितीत पाण्याची कमतरता भासू नये त्यामुळे नगरपरिषदेची चालू असलेली कामे तात्काळ लवकरात लवकर थांबवण्याची मागणी युवा सेना तुळजापूर तालुकाप्रमुख प्रतीक बप्पा रोचकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केले आहे.
येत्या काळात सदरील कामे नाही थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी युवा सेनेच्या वतीने प्रतिक रोचकरी यांनी दिला आहे.

