मंगळवार पेठ जुना सरकारी दवाखाणा कार पार्कींग बाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषद येथे दाखल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहीती

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर शहरातील नागरीकांच्या सुचने नुसार शहरातील मध्यवर्ती भागात भाविकांच्या सोयीच्या दृष्टी कोणातुन शहरात मंगळवार पेठ येथील जुना सरकारी दवाखाना या ठिकाणी कार पार्कींगची व्यवस्था करण्यात यावी. यासाठी आमदार राणागजजितसिंह पाटील यांना पुजारी, नागरीक यांनी निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सदरील जागेची स्थळ पहाणी करुन नगर परिषद मुख्याधिकारी यांना संबंधीत पार्कींगच्या जागे बाबत जिल्हा परिषद विभागास पार्कींच्या जागे बाबतचा सविस्तर प्रस्ताव पाठवण्यास सांगीतला आहे. 


त्या अनुशंगाने नगर परिषद तुळजापूरने मंगळवार पेठ भागातील जुना सरकारी दवाखाना शहरातील भाविकांसाच्या सोयीसाठी वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था व्हावी. यासाठी जुन्या सरकारी दवाखाण्याच्या जागेत वाहणाची पार्कींग करणे करीता ना हरकत देऊन पार्कींग व्यवस्था करणे बाबत पत्र दिले आहे.


यावेळी युवा नेते विनोद गंगणे, मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी, पुजारी संभाजी भांजी, अमर पेंदे, विकास शिंदे, शहाजी भाजी, शाहुराज मगर, प्रकाश मगर, नानासाहेब लोंढे, काका चिवचिवे, राजेश्वर कदम, नानासाहेब डोंगरे, अभिजीत कदम, लखन पेंदे, शांताराम पेंदे, किशोर गगंणे, सचिन कदम, समर्थ पैलवान, रोहत चव्हाण, नरेश अमृतराव, जेष्ठ पुजारी तानाजी डोंगरे आदी नागरीक पुजारी बांधव उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top