व्यसनमुक्ती केंद्रापेक्षा ज्ञानकेंद्रे चांगली - डॉ आनंद मुळे

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने व्यसन आणि आजची तरुण पिढी या विषयावर डॉ आनंद मुळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्यांनी वरील प्रतिपादन केले.


सिगारेट व तंबाखूच्या पॅकेटवर धोक्याची सूचना वाचून देखील लोक व्यसन करतात,या घातक सवयी आहेत, ज्यामुळे समाज उदासीन होत आहे, आधुनिक काळात व्यसनांचे प्रकार बदललेले आहेत, तंबाखू,दारु, सिगारेट,या ही पेक्षा भयंकर व्यसन म्हणजे स्मार्ट फोन, मोबाईल स्मार्ट आहेत पण माणसं विद्रुप होत चालली आहेत,आज लोकांचा एकमेकांशी शाश्वत संवाद होत नाही,आज तरुणांना मित्रांची गरज नाही,कारण हातात स्मार्ट फोन आहे आणि हेच फोन म्हणजे तरुणांचे विश्व झाले आहे,त्यांच्या मेंदुचा ताबा मोबाईलने घेतला आहे, माणूस अक्षम होत चालला आहे,गरीब होत चालला आहे, मोबाईल कंपन्या गबरगंड होत आहेत.तरुणांनी आठवड्यातून एक दिवस इंटरनेट वापरायचे नाही असा निश्चय करावा, मित्रांसोबत गप्पा माराव्यात,अगदी भांडण झाले तरी चालेल,, मोबाईलच्या व्यसनामुळे माणूस हरवत चालला आहे,कारण त्याचा कमीतकमी चांगल्या कामासाठी उपयोग होतो आहे, तेंव्हा या जीवघेण्या व्यसनांपासून दूर राहून ग्रंथावर साचलेली धुळ उडवावी तरच आयुष्य सुकर होईल असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बाळासाहेब कुकडे यांनी केले तर प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले, यावेळी डॉ.मंत्री आर आडे, डॉ.नेताजी काळे यांच्यासह सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार प्रा डॉ अनंता कस्तुरे यांनी मानले.सदर कार्यक्रम प्र प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top