तुळजापूर प्रतिनिधी
कृष्णा खोऱ्यातील 21 टीएमसी पाणी योजना कार्यान्वित झाल्यानंतर योजनेचा पहिला लाभार्थी सावरगाव काटीचा असेल असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले ते सावरगाव येथे काठी गटातील काँग्रेस कार्यकर्त्याच्या जनसंवाद मेळाव्यामध्ये बोलत होते. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, हा भाग टँकर ग्रस्त होता परंतु सावरगावच्या साठवण तलावामुळे या भागातील अर्थकारण बदलले द्राक्ष परदेशात निर्यात होऊन येथील शेतकरी आर्थिक संपन्न होताना दिसत आहे. यासह भाजीपाला, ऊस लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन शेतकऱ्यांना काही प्रमाणात सुबत्ता आली यामध्ये फक्त तलावावरील लाभधारक शेतकऱ्यांनाच फायदा झाला परंतु 21 टीएमसी पाणी योजना कार्यान्वयीत झाल्यानंतर हा सर्व भाग सुजलाम सुफलाम होईल संपूर्ण परिसर बागायती होईल या भागात नळ पाणीपुरवठा योजना, आरोग्याच्या सुविधा, पशु उपचार केंद्र, साठवण तलावातून रस्ता, नागोबा मंदिर तीर्थक्षेत्राचा विकास यासह सिंचन विहिरी शेतरस्ते, वीज वितरणासाठी स्वतंत्र लाईन, समाज मंदिरे यासारखी अनेक समाज उपयोगी कामे केलेली आहेत.
यावेळी त्यांनी या गावचे माजी सरपंच कै. कालिदासराव लिंगफोडे यांनी शाळा, दवाखाना व सबस्टेशन साठी जमिनीचे दानपत्र दिले आणि या भागाचा विकास करून घेण्यासाठी मोलाची मदत केल्याची आठवणही आवर्जून काढली. पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की अपूर्ण राहिलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी उभा राहणार असून मतदानाच्या रूपाने मला आशीर्वाद द्यावा असे आवाहनही त्यांनी उपस्थित जनतेला केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मुकुंदराव डोंगरे पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरकर युवा नेते ऋषिकेश मगर रामचंद्र ढवळे इत्यादींनी मनोगत व्यक्त केले यावेळी सावरगाव चे माजी सरपंच रामेश्वर आबा तोडकरी वडगाव काटीचे सरपंच गौरीशंकर कोडगिरे दहिवडीचे माजी सरपंच रविराज अंबुरे चेअरमन भागवत मंडलिक सावरगाव चे उपसरपंच धर्मराज शिंदे, काटीचे उपसरपंच चंद्रकांत काटे, सुरतगावचे सुनील नकाते, नागनाथ पाटील, केमवाडीचे धनंजय काशीद, प्रताप निंबाळकर, उत्तम माने, अमर माने, दत्तात्रय तानवडे, संदीप गायकवाड, उमेश चौगुले, खुंटेवाडी चे उद्योजक मोहन जाधव, राजेंद्र जाधव माजी सरपंच आबा शिंदे भैरीनाथ काळे, सचिन भोजने, काका लिंगफोडे यांचे सह परिसरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब काडगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रामेश्वर आबा तोडकरी यांनी केले.
