तुळजापूर बंदला उत्स्फूर्स प्रतिसाद

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरातही बंद ला प्रतिसाद मिळाला आहे. मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण, हैद्राबाद गॅझेट लागू करा यासह विविध मागण्यासाठी मराडवाडा मुक्तीसंग्राम दिन १७ सप्टेंबर पासून मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्या वेळी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. 

आज शनिवारी हा आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून शनिवारी (दि.२१) धाराशिव जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये पूर्ण जिल्ह्याने सहभाग घेतला होता . याच पार्श्वभूमीवर तुळजापूर शहरातील बंद पाळण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा समाज बांधव एकत्र येत भवानी रोड मार्गे मंदिर परिसरातील व शहरातील विविध ठिकाणी फिरत शहरातील दुकाने बंद केली. त्याला प्रतिसाद देत तुळजापूर करांनीही यात उत्स्फूर्स सहभाग नोंदवला. धाराशिव रोड, तुळजा भवानी मंदिर परिसर सह अनेक भागात शुकशुकाट दिसून आला. 

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top