तुळजापूर येथे मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फॉर्म भरून घेण्यास सुरवात

mhcitynews
0

 

तुळजापूर प्रतिनिधी 

महाराष्ट्रातील 65 वय ओलांडलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी सरकारची मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे. जेष्ठ नागरिकांना वय वाढल्यानं दिसण्यास त्रास होतो, ऐकणे आणि चालण्यात समस्या येतात पण त्यासाठी लागणारी गरजेची उपकरणं खरेदी करता येत नाहीत, अशा नागरिकांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने तुळजापूर येथे ,आमदार राणा जगजीतसिंह पाटील युवा नेते विनोद { पिंटू } गंगणे यांच्या सूचनेनुसार वयोश्री योजनेचे फॉर्म वाटपास शहरातील विश्वास नगर, मोतीझरा, लमान तांडा, हडको वसाहत येथे डोर टू डोर जाऊन सुरुवात करण्यात आली.


यावेळी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते इंद्रजीत साळुंखे, धैर्यशील दरेकर, बाळासाहेब भोसले, नितीन पवार,भा ज पा महिला आघाडी प्रमुख. सौ सुरेखाताई पवार, काजल पवार, अशोक चव्हाण,शंकर धेनु राठोड, बाबू पवार, रमेश राठोड, लक्ष्मीबाई डाके, हरिभाऊ पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. योजने विषय खालील प्रकारे माहिती देण्यात येत आहे.


सदर योजनेतून 65 वर्ष पूर्ण वय असणाऱ्या लाभार्थीस


चष्मा ,श्रवण यंत्र ,ट्रायपॉड ,स्टिक ,व्हील चेअर ,फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची ,नी ब्रेस ,लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर, इत्यादी आवश्यक वस्तू खरेदीसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून सदर लाभार्थीस तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार असून योजनेसाठी आधार कार्ड झेरॉक्स, 2 पासपोर्ट सईज फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, ओटिंग कार्ड,/पॅनकार्ड//ई इश्रमकर्ड/आयुष्मान कार्ड/किसान क्रेडिट कार्ड आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत.


मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी कोण पात्र?


अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा. अर्जदाराचे वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. उमेदवाराला शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असावा. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. राज्यातील किमान 30 टक्के महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top