नवरात्र महोत्सव यात्रेत उपाययोजनांचा अभाव
कोट्यावधी रूपयांचा यात्रा अनुदान जातो तरी कुठे?
तुळजापूर प्रतिनिधी
श्रीक्षेत्र तुळजापूर नवरात्र महोत्सव काळात शहरात निर्माण झालेल्या असुविधा बाबत महाविकास आघाडीच्या वतीने गुरुवार दि. 3 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अमोल कुतवळ बोलत होते.
याप्रसंगी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाम पवार, माजी नगरसेवक राहुल खपले बापूसाहेब नाईकवाडी,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शरद नंन्नवरे तोफिक शेख, शेकापचे उत्तम अमृतराव, माजी नगरसेवक नारायण भांजी आदि उपस्थित होते.
श्री तुळजाभवानी मंदिरात अभिषेक पास साठी भाविकांची व पुजारांची हेळसांड अभिषेक पास देते वेळेस पुजारी यांचे नाव व मोबाईल नंबर का घेतले जात नाही देवीच्या प्रक्षाळ वेळी आधार कार्ड पाहून स्थानिक नागरिकांना मंदिरात सोडण्यात यावे शहराच्या मध्यभागी असलेल्या बस स्थानकाचे काम विनापरवाना चालू असून बसस्थानका मागील बाजूस 15 फूट जागा कोणाच्या आदेशाने सोडण्यात आली, तुळजापूर नगरीतील साळुंखे गल्ली भागातील नालीचे पाणी रस्त्यावर साचल्याने महिला भाविक नालीत पडली तुळजापूर नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे स्थानिक नागरिकांसह देवी भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, नगरपालिकेचे कर्मचारी कार्यक्षम नाहीत का, पार्किंग परिसरामध्ये वाहन आल्यास तेथे पार्किंग कर घेण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आदेश देऊनही शहराच्या प्रवेशद्वारावरती पार्किंग ठेकेदार यांच्याकडून सक्तीने प्रवेश कर वसूल केला जातो हा प्रकार कोणाच्या कृपाशीर्वादाने चालू आहे. शहराला पुरविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात भेदभाव का केला जातो कुठे पंधरा मिनिट तर कुठे एक एक दीड दीड तास पाणीपुरवठा केला जातो पाणीपुरवठ्या संदर्भात कायमस्वरूपी एकच कर्मचारी ठेवण्यात यावे अनेक भागातील पथदिवे बंद असून रात्रीच्या अंधारात भाविकांना नागरिकांना मार्ग शोधावा लागत आहे स्वच्छते संदर्भात जिओ टॅगिंग केले आहे पण घंटागाड्या वेळेत नाही स्वच्छता टेंडर एकाच कंपनीकडे का घंटागाड्यावरील कर्मचारी किती, स्वच्छता कर्मचारी किती याचा खुलासा करणार कोण, भाविकांसाठी पिण्याचे पाणी, जागोजागी लघुशंकालय नसल्याने भाविकांची हेळसांड होते, नगर परिषदेत गेल्या दोन वर्षापासून मुख्याधिकारी नाही पूर्णवेळ मुख्याधिकारी कधी मिळणार, शारदीय नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून येणारा कोट्यावधी रुपये जातात कुठे सेवा सुविधा उपाययोजनांचा अभाव अनेक समस्यांना भाविकांसह नागरिकांना सामोरे जावे लागत आहे, तुळजापूर तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी विकास कामाच्या केवळ पोकळ घोषणा केल्या आहेत त्याची अंमलबजावणी कधी होणार डिजिटल वर दिसणारे विकास प्रत्यक्षात कधी उतरवणार,तीर्थक्षेत्र तुळजापूर प्रस्तावित विकास आराखड्याला स्थानिक नागरिक व्यापारी पुजारी बांधव यांनी विरोध दर्शवला असताना तोच प्रस्ताव राज्य सरकारकडे का मांडला जात आहे. असा सवाल कुतवळ यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

