मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत जिल्ह्यात खोताचीवाडी प्रथम
तुळजापूर प्रतिनिधी
येथील युवास्पंदन सामाजिक संस्था व मराठवाडा सामाजिक संस्था यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल खोताची वाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अशोक खडके सहशिक्षिका मनीषा क्षिरसागर (खडके), महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तुळजाभवानी अध्यापक विद्यालयाचे प्रा. विवेक कोरे, राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय तीर्थ (बुद्रुक) येथील शिक्षक तानाजी म्हेत्रे , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोताचीवाडीचे मुख्याध्यापक अशोक खडके यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक ब या शाळेतील शिक्षिका मनीषा क्षीरसागर खडके यांचा तुळजापूर तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल यांचा सत्कार संस्थेचे स्वागताध्यक्ष अमर(दाजी) हंगरगेकर , प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, युवास्पंदन संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे, सचिव प्रा.डाॅ.प्रशांत भागवत, प्रकाश मगर मराठवाडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण हंगरगेकर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष सचिन राऊत न.प.प्रा.शाळा क्र.२ चे मुख्याध्यापक गणेश रोचकरी यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी जि.प.प्रा. शाळा ढेकरीचे मुख्याध्यापक वैजनाथ कुलकर्णी, शहाजी अण्णा कावरे, क्रीडा शिक्षक विष्णू दळवी, देविदास गायकवाड, संजय कांबळे, अश्विनी म्हेत्रे उपस्थित होते. प्रास्ताविक महेंद्र कावरे यांनी केले यावेळी प्रकाश नगर प्रा.डाॅ. प्रशांत भागवत यांनी मनोगत व्यक्त केले. आभार स्वागत अध्यक्ष अमरदाजी हंगरगेकर यांनी मानले.
