सुवर्णपदक विजेता रैयान सिद्दीकी याचा सत्कार

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तैवान येथे पार पडलेल्या एशियन युथ चॅम्पियन्स शिप मध्ये आर्चरी या खेळ प्रकारात रियान तौफिक सिद्दीकी याने सुवर्णपदक जिंकून तुळजापूर शहराचे नाव संपूर्ण अशिया खंडामध्ये लौकिक केले त्याबद्दल त्याचा सत्कार काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष धिरज भैय्या पाटील जनसेवक अमोल कुतवळ अल्पसंख्याक सेल चे जिल्हाध्यक्ष तौफिक शेख यांच्या वतिने करण्यात आला. सिद्दीकी घराची परंपरा जपण्याचे काम त्याने केले , रियान सिद्दीकी चे चुलते बाबर सिद्दीकी यांनी महाराष्ट्रातील खेळामधील पहिला सर्वोच्च छत्रपती पुरस्कार मिळवला होता. आज त्याचे कौतुक सर्व तुळजापूर वासीयाकडुन होत आहे. 


यावेळी लाईक सिद्दीकी, अजु भाई सिद्दीकी, खालीद सिद्दीकी, आवेज सिद्दीकी, कलीम सिद्दीकी, जुनेद सिद्दीकी, सचिन घोगरे, संजय कदम, किशोर पाटील, बापु चव्हाण, सुनील मामा शिंदे, प्रविण पाटील, जफर शेख, आण्णा गुंडगिरे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top