मुद्याचं बोला ! विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय ?
भविष्यात होणाऱ्या लोकप्रतिनिधिकडून शैक्षणिक क्षेत्रात बदल होणे आवश्यक आहे अशी मी एक 21 वर्ष पूर्ण तरुण विद्यार्थी म्हणून अपेक्षा करतो. ही कामे सरकारकडून येणारा निधी तसेच मंदिर ट्रस्ट च्या वतीने करण्यात यावीत. श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट च्या वतीने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ठराविक टक्केवारिची अट घालून 10 वी नंतर मेडिकलच्या NEET व CET परीक्षेसाठी, डिप्लोमा विविध इंजिनिअरिंग फिल्ड मध्ये करण्यासाठी शिष्यवर्ती देऊन आर्थिक सहाय्य करावे, तुळजापूर मध्ये शाळे व कॉलेज करिता बाहेर गावावरून येणाऱ्या मुलामुलींसाठी मोफत बस पास सुविधा चालू करण्यात यावी, तसेच त्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनीना सकाळी नाश्ता व जेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, स्पर्धा परीक्षेची अकॅडेमी उभारावी, पोलीस भरती, सैन्य भरती याकरिता डिफेन्स अकॅडेमी उभरावी, तसेच सर्व सोयीणी युक्त स्वतंत्र अभ्यासिका व आवांतर वाचणाच्या पुस्तकांनी युक्त वाचनालय उभारावे, रोजगार मेळावे भरवावे, तुळजापूर तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये आठवड्यातील 2 तासिका या मुलींसाठी कराटे प्रशिक्षणाठी असावेत, तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचं दर 15 दिवसातून आरोग्य तपासणी करण्यात यावी, विविध सरकारी योजनाची माहिती विद्यार्थ्याना शाळा - कॉलेज मधेच देण्यात यावी म्हणजे जेणेकरून त्या योजना या गावोगावी आणि घरोघरी पोहचतील, इत्यादी.
शिक्षण क्षेत्राचा प्रामुख्याणे विचार केला गेला पाहिजे कारण तुळजापूर शहरातील विद्यार्थी विद्यार्थीनी शिकतील तरच त्या आपल्या देशातील काहीतरी करुन दाखवतील.
माझामते पुढीलप्रमाणे शिक्षण क्षेत्रात बदल घडवावे :-
संपूर्ण तुळजापूर शहराचं वातावरण हे विद्यार्थ्यासाठी हे शैक्षणिक असलं पाहिजे. मुलामुलीनी आपल्या जिवनात खुपखुप शिकुन वेगवेगळया क्षेत्रात स्वतः बरोबरच आपल्या कुटुंबाची, गावाची राज्याची, देशाची प्रगती साधली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक शाळेतील विशेषता माध्यमिक शाळेच्या शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले पाहिजे. मुलांना वर्गात विषयाचज्ञान देतदेत संपुर्ण अयुष्यातीलवेगवेगळयाकरिअरबद्दल वेगवेगळया क्षेत्राबद्दल योग्य माहिती दिली गेली पाहिजे. शिक्षण शिकण्याचं महत्व प्रत्येक शिक्षकांनी आपल्या विदयार्थ्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवानुसार विदयार्थ्यांला इयत्ता आठविपासुनच वेगवेगळया क्षेत्राची माहिती त्याला समजली गेली पाहिजे परंतू अस होताना दिसत नाही ज्याच्या घरी मोठे भाऊ बहिण उच्चशिक्षण घेतलेले असतात त्याना मार्गदर्शन प्राप्त होते परंतु ज्याच्या घरी असे कोण शिकलेलं नसत अशि मुले दहावी नंतर तसा महत्त्वपुर्ण निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा आपल्या मराठवाडयातील मुले इंग्रजी विषयाला घाबरुन मेडिकल इजिनीअरिंग सारख्या फील्ड कडे वळत नाहीत. सर्व काही असुन देखील मार्गदर्शनाच्या कमतरतेमुळे माघे पडतात हा चिंतनाचा विषय आहे. याबद्दल प्रत्येक शाळेतील
शिक्षकांना बोलावुन विध्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवुन देण्याची बाब स्पष्ट केली पाहिजे.
• जे विध्यार्थी दर वर्षी दहावी बारावीत चांगल्या गुणांनी उत्र्तीण होतात त्यांचा सत्कार तुळजाभवानी मंदिर ट्रस्टच्या वतीने चांगली बक्षिसे देवुन करण्यात यावा.
• विद्याथ्यांसाठी शिष्यवर्ती योजना राबवण्यात याव्या. अत्यत गरिब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दहाविनंतर ठराविक टक्केवारीची अट ठेवुन पुढे मेडीकलच्या NEET परिक्षेसाठी तसेच CET परिक्षेसाठी, डिप्लोमा विविध इंजिनिअरिंग फिल्ड मध्ये करण्यासाठी शिष्यवृत्ती देऊन आर्थिक सहाय्य करावे.
• तुळजापूर शहराच्या गावा जवळुन येणाऱ्या मुला मुलींसाठी मोफत वाहन सेवा किंवा मोफत बस सेवा करण्यात यावी.
• तुळजापूर शहरामध्ये स्पर्धा परिक्षेची संर्पण ज्ञान देणारी एखादी अॅकॅडमी उभारण्यात यावी जेने करुन तुळजापूर शहरातील विध्यार्थी M.P.S.C आणि U.P.S.C सारख्या स्पर्धा परिक्षाची तयारी शहरामध्ये करु शकतील
• स्पर्धा परिक्षेप्रमाणेच पोलीस भरती, सैन्य भरती इत्यादी डिफेन्स सव्हींस चाही समावेश असणारी किंवा प्रशिक्षण देणारी एखादी अॅकॅडमी पुढाकराणे चालु करावी.
• तुळजापूर मध्ये सर्व सोयीनी 18/19 अभ्यासिका व सर्व उपयोगी पुस्तकांनी युक्त वाचनालय उभारण्यात यावे.
• आभियांत्रीकी क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी मिळाव्या पुणे- मुंबईतील विविध कंपन्यांना बोलावून रोज मेळावा भरवावा.
सध्याच युग हे डिजीटल युग हे डिजीटल युग म्हणून ओळखलं जात. भारताकडे युथ आणि इंग्लीश भाषीक तरुण असल्यामुळे हा एक IT सेकटरसाठी एक महत्तवाची बाब ठरत आहे. विविध प्रकारचे कोर्स करुन विध्यार्थ्यांना अगदी सहज जॉब मिळत आहेत. येणाऱ्या काही वर्षात सुध्दा सर्व ऑनलाईन व अॅडव्हान्स टेकनॉलोजीमुळे IT चे महत्व वाढतच राहणर आहे. त्यामुळे या गोष्टी बद्दल विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन व्हावे.
सामाजीक, शैक्षणिक, वैदयकीय, औदयोगिक क्षेत्रातील सध्या चालु परिस्थीतीचं व दुर दृष्टीकोन ठेवून भविष्यातील परिस्थीला अनुसरुन विस्तृतपणे मत मांडले असून.
मी जेवढा बारीक गोष्टीचा विचार करुन अभिप्राय लिहला जातो . त्या गोष्टी सध्या सर्वाना समजणं गरजेच आहे. मग तो व्यसनाबद्दल असो वा शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण शहरात कशाप्रकारे निर्माण करता येईल त्याबद्दल असो. आर्थीक दृष्ट्या कस जास्तीत जास्त मजबूत होईल यावर लक्ष दिले पाहिजे
आगामी होणाऱ्या लोकशाहीचा उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन योग्य उमेदवार निवडून लोकशाही अधिक बडकट करण्याची अपेक्षा करतो की तुळजापूर विकासासाठी जो निधी आला आहे व अजून भविष्यात येणार आहे त्याचा प्रामानिकपणे उपयोग होईल व सर्व ठरवलेल्या गोष्टी पुर्ण होतील अशी अपेक्षा बाडगतो
ढवळे समर्थ नंदकुमार
मो नं :-9356467212
