तुळजापूरची निवडणूक निर्णायक आणि सिद्ध करून दाखवणारी ठरणार

mhcitynews
0

 

मतदार संघात कोण मारणार बाजी ?


तुळजापूर / सिद्दीक पटेल 

विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत येण्यास सुरुवात झाली आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 23 ला निकाल लागणार आहे. हि निवडणूक अभूतपूर्व आहे. जे राजकारण गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या मैदानावर खेळलं गेलं, त्यानं पूर्वीचे सारे डाव मोडून टाकले. आता नवे डाव पडले आहेत. ते डाव कसे पूर्णत्वाला जातील, याची पूर्वकल्पना कोणीही देऊ शकणार नाही. ते फक्त 23 नोव्हेंबरलाच निकाल लागल्यावरच समजू शकेल. महाराष्ट्र स्पष्ट निर्णय देईल, की पुन्हा तोच प्रकार , हेही त्यानंतरच समजेल. निर्णय कसाही येवो, पण एक निश्चित आहे की काही नेत्यांची कारकीर्द या निवडणुकीत पणाला लागली आहे. त्यांच्यासाठी ही सर्वस्वाची लढाई बनली आहे. 


तुळजापूर मतदार संघाचे बोलायचे झाले भाजप महायुतीचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील विरुद्ध काँग्रेस महाविकास आघाडीचे ऍड. कुलदीप उर्फ धीरज पाटील तर समाजवादी पार्टी कडून देवानंद रोचकरी यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवारांनी आपापल्या परीने जोरदार प्रचार सुरू केला आहे. राणा जगजीतसिंह पाटील यांचा पराभव करण्यासाठी कुलदीप उर्फ धिरज पाटील व देवानंद रोचकरी यांच्या कडून जोरदार प्रयत्न सुरु असून तुळजापूर मतदार संघात काटेकी टक्कर सुरू असल्याचे सध्याचे वातावरण दिसत आहे. परंतु जसजशे मतदानाचे दिवस जवळ येतील तसे दोन्ही उमेदवारांकडून नव नवीन डाव टाकले जातील. ते डाव कसे पूर्णत्वाला जातील, व कोण बाजी मरणार याची पूर्वकल्पना कोणीही देऊ शकणार नाही. ते फक्त 23 नोव्हेंबरलाच समजू शकेल. 


मात्र काहींसाठी ती केवळ निवडणूक अशी न राहता, ती वैयक्तिकही झाली असल्याचे चित्र मतदार संघात दिसून येत आहे. शिवाय अनेकांसाठी ही निवडणूक एवढं काही पणाला लागलं आहे की जर विजय मिळाला नाही तर पक्ष आणि वैयक्तिक कारकीर्द अवघड वळण घेईल की त्यातून सावरणे त्यांच्यासाठी जिकिरीचे असेल. असे वातावरण निर्माण झाले आहे, किंबहुना निर्माण केले आहे. अर्थात, राजकारणात अंतिम काहीही नसतं, काही दारं बंद होतात, तर काही उघडतात. तरीही यंदाची तुळजापूर विधानसभा निवडणूक नेत्यांसाठी निर्णायक आणि काही सिद्ध करुन दाखवणारी आहे.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top