तुळजापूर प्रतिनिधी
म.वि.रा शिंदे हायस्कूल,तुळजापूर येथील विद्यार्थी मयुरेश तानाजी म्हेत्रे याची 'शालेय क्रीडा स्पर्धा राज्यस्तरीय निवड चाचणी 2024-25' साठी निवड करण्यात आली आहे. 30 ऑक्टोबर 2024 रोजी नांदेड येथे विभाग स्तरावर 14 वर्षे वयोगटाखालील क्रिकेट स्पर्धा निवड चाचणी घेण्यात आली होती.
तुळजापूर सारख्या शहरांमध्ये कोणत्याही प्रकारचा क्रिकेट क्लब नसतानासुद्धा फक्त शालेय स्तरावर स्वतः ची मेहनत,व्यासंग,जिद्द आणि चिकाटी यातून मयुरेश ची राज्यस्तरावर निवड झाली याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. क्रीडा शिक्षक लालासाहेब आदटराव, शाळेतील शिक्षक तसेच पालक तानाजी म्हेत्रे यांचे मार्गदर्शन त्याला मिळाले.