प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियान मोफत प्रशिक्षण : लाभ घेण्याचे आवाहन

mhcitynews
0


धाराशिव प्रतिनिधी 

जिल्हयातील युवक-युवतींसाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२४ -२५ अंतर्गत मोफत कौशल्य विकास कार्यक्रमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


प्रशिक्षणात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, टेलिकॉम,इलेक्ट्रॉनिक्स - सोलार टेक्नीशिअन,अॅप्रेल,मिडीया अॅन्ड एन्टरटेनमेंट,ब्युटी अॅन्ड वेलनेस,टुरिझम अॅन्ड हॉस्पीटॅलिटी या सेक्टरमधील कोर्सचे मोफत कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


या प्रशिक्षणासाठी वयाची अट १५ ते ४५ वर्षे आहे.उमेदवार हा धाराशिव जिल्हयाचा रहिवासी असावा.तसेच यापुर्वी कौशल्य विकास प्रशिक्षण घेतलेला नसावा.१५ ते ४५ वयोगटातील इच्छुक व पात्रताधारक कौशल्य प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या या गुगल फॉर्म लिंकच्या उमेदवारांनी https://forms.gle/l2TWxtA5hv3Eogy9 माध्यमातुन १० जानेवारी २०२५ पर्यंत आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी दुरध्वनी २४७२-२९९४३४ यावर संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त,जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,प्रशासकीय इमारत, धाराशिव यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top