तुळजाई नगरीत राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार सोहळा संपन्न

mhcitynews
0

ममता सिंधुताई सपकाळ यांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार प्रदान 

तुळजापूर प्रतिनिधी 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजाई नगरीत पहिला राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.


अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या प्रसिद्ध गजलकार ममता सपकाळ यांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार गुरुवर्य हभप गहिनीनाथ महाराज औसेकर आणि गुरुवर्य महंत तुकोजीबुवा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप तुळजाभवानी मातेला नेसवलेली मानाची पैठणी,कवड्याची माळ,शाल, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे होते. पुजारी नगर फाऊंडेशनतर्फे अनाथ मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी 51 हजार रुपयाचा धनादेश मान्यवरांच्या उपस्थितीत ममताताईंना देण्यात आला.


याप्रसंगी व्यासपीठावर संस्कार भारती प्रदेशाध्यक्षा स्नेहल पाठक, सरपंच परिषद प्रदेशाध्यक्षा जिनत कोहिनूर सय्यद, मंदिर तहसीलदार माया माने,विनय सिंधुताई सपकाळ, पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी, शुभांगी पुजारी आदींची उपस्थिती होती.


पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा.विवेक कोरे, प्रास्ताविक अनिल आगलावे तर आभार डॉ.सतीश महामुनी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top