तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात ICU अभावामुळे रुग्णांचे हाल – तातडीने सुविधा वाढवण्याची मागणी

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक तुळजापूर शहराला भेट देतात. मात्र, येथे आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्यामुळे भाविक व नागरिकांना जीवघेणा फटका बसत आहे. नुकत्याच घडलेल्या अपघाताने या समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.


लक्झरी बस अपघात आणि ICU सुविधेचा अभाव

दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी सोलापूर घाटात एक लक्झरी बस पलटी झाली होती. या भीषण अपघातात 40 ते 50 भाविक जखमी झाले. मात्र, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात ICU नसल्यामुळे गंभीर जखमींना धाराशिव (22 किमी) किंवा सोलापूर (44 किमी) येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या विलंबामुळे उपचार वेळेवर न मिळाल्याने रुग्णांचे प्राण धोक्यात आले.


ICU मंजुरीसाठी शिवसेनेची मागणी

या पार्श्वभूमीवर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाम पवार यांनी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात जास्तीत जास्त ICU सुविधा मंजूर करण्याची मागणी केली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही व्यवस्था अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले.


"तुळजापूर हे धार्मिक पर्यटन स्थळ असल्याने येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. अपघात झाल्यास तातडीच्या ICU सुविधांचा अभाव प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे शासनाने तातडीने ICU मंजुरी द्यावी," अशी मागणी पवार यांनी केली आहे.


तुळजापूर शहरात अत्याधुनिक आरोग्य सुविधा निर्माण झाल्यास अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांना तातडीने मदत मिळेल. त्यामुळे सरकारने तातडीने सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top