शेतकऱ्यांनो, सावधान! PM Kisan APK लिंक उघडताच बँक खाती रिकामी!

mhcitynews
0

धाराशिव प्रतिनिधी 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. काही सायबर गुन्हेगार शेतकऱ्यांच्या मोबाईलवर PM Kisan list. APK किंवा PM Kisan APK या नावे बनावट लिंक पाठवत आहेत. ही लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.


शासनाचा इशारा – लिंक उघडू नका!

शासनाने याबाबत अधिकृतपणे सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. कृषि विभागाने स्पष्ट केले आहे की, PM Kisan योजनेशी संबंधित कोणतीही अधिकृत माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरच उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.


शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना:

✅ कोणतीही अनोळखी लिंक उघडू नका.

✅ PM Kisan च्या नावाने आलेल्या कोणत्याही अ‍ॅप किंवा APK फाईल डाउनलोड करू नका.

✅ बँक खात्यातील व्यवहार नियमित तपासा आणि संशयास्पद व्यवहार दिसल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधा.

✅ सायबर गुन्ह्यांची तक्रार जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात नोंदवा.


सरकारची सतर्कता, तुमची सावधगिरी!

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही अडचण आल्यास अधिकृत सरकारी वेबसाईट किंवा कृषि विभागाशी संपर्क साधावा. स्वतःची आणि आपल्या मेहनतीने कमावलेल्या पैशांची सुरक्षा करा!


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top