एक कुटुंब, एक वृक्ष : वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा अभिनव उपक्रम

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

“एक कुटुंब, एक वृक्ष” या संकल्पनेला पुढे नेत मा. श्री विशाल (भैय्या) रोचकरी व सौ. सुरेखा (ताई) पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विश्‍वास नगर, हडको (अपशिंगा रोड) येथे वृक्षवाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांच्या विशेष लक्षात राहिला.


या उपक्रमात तुळजापूर शहरातील पत्रकार अजित चंदनशिवे व उद्योजक अण्णासाहेब कणे यांचाही वाढदिवस असून त्यांना देखील वृक्ष भेट देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गुलचंद व्यवहारे, प्रदीप अमृतराव, धैर्यशील दरेकर, दिनेश क्षीरसागर, चिन्मय मगर, जगदीश वाघमारे, निलेश मगर, सुरज भोसले, विठ्ठल गाटे, सागर कदम, बालाजी पवार आणि सुरज लाटे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


कार्यक्रमास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वृक्षवाटप २८ तारखेपर्यंत सुरु राहणार असून, इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


या उपक्रमाचे आयोजन ‘माझा आनंद प्रतिष्ठान’ आणि ‘संकल्प प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. वाढदिवस साजरा करण्याचा असा पर्यावरणपूरक मार्ग समाजात सकारात्मक संदेश देणारा आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top