ऍक्वारिजम इंटरप्राइजेस तर्फे तुळजाभवानी महाविद्यालयास आर्थिक सहायता

mhcitynews
0

 


तुळजापूर प्रतिनिधी

तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे नविन शैक्षणिक धोरणानुसार विविध शैक्षणिक कामे प्रगतीपथावर सुरू असुन याच पार्श्वभूमीवर तुळजाभवानी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक विलास जगदाळे यांच्या सहयोगाने ऍक्वारिजम इंटरप्राइजेस यांच्याकडून शैक्षणिक कामासाठी २५००० इतकी आर्थिक मदत महाविद्यालयास प्रदान करण्यात आली, यावेळी प्र.प्राचार्य डॉ जीवन पवार म्हणाले की,तुळजाभवानी महाविद्यालयात शै वर्षे २०२४-२५ पासून आम्ही तुळजापूरकर शिक्षणासाठी एक पाऊल पुढे हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येत आहे, महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्र शासनाचा करिअर कट्टा उपक्रम राबविण्यात येत आहे,आपले विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कुठेही मागे रहाता कामा नयेत या प्रांजळ भूमिकेतून महाविद्यालय काम करत आहे असे मनोगत त्यांनीं व्यक्त केले, यावेळी ऍक्वारिजम इंटरप्राइजेसचे प्रमुख विजय हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top